ऐश्वर्या लोकरे हिचे मंत्रालय लघुलेखक परीक्षेत यश

ऐश्वर्या लोकरे हिचे मंत्रालय लघुलेखक परीक्षेत यश


रमजान कराडे - वेदगंगा वार्ता                                            नानीबाई चिखली ता. 7

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगा ( एमपीएससी ) मार्फत घेण्यात आलेल्या मंत्रालय लघुलेखक परीक्षेत येथील ऐश्वर्या जितेंद्र लोकरे यांनी दैदीप्यमान असे यश संपादन केले. त्यांची  मराठी निम्नश्रेणी लघुलेखक मंत्रालय येथे वर्ग 2 च्या पदी नियुक्ती झाली आहे. या पदावर निवड होणाऱ्या त्या कागल तालुक्यातील प्रथमच महिला आहेत. 

ऐश्वर्या लोकरे यांचे प्राथमिक शिक्षण विद्या मंदिर तामगाव, माध्यमिक शिक्षण श्री काडसिद्धेश्वर हायस्कूल कणेरी तर बारावीपर्यंत शिक्षण महाराणी लक्ष्मीबाई गर्ल्स हायस्कूल कोल्हापूर येथे झाले. विवाहा नंतर त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले. सोबतच त्यांनी टायपिंग तसेच एमएससीआयटीचे शिक्षण सासरी नानीबाई चिखली येथे पूर्ण केले. यातूनच त्यांनी मंत्रालय लघुलेखक परीक्षा दिली होती. यावेळी त्यांनी कोणताही खाजगी क्लास लावला नव्हता. परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात त्यांनी हे यश मिळवले. या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. 


पती जितेंद्र लोकरे यांची खंबीर साथ...                        जितेंद्र लोकरे हे सध्या सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात चरण येथे प्राथमिक शिक्षक काम करीत आहेत. प्राथमिक शिक्षक होण्यापूर्वी त्यांनी कागल येथील हसन मुश्रीफ फाउंडेशन स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये मार्गदर्शक शिक्षक म्हणून काम केले होते. येथे काम करीत असताना त्यांचे अनेक विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. 

आपल्या याच अनुभवाचा फायदा त्यांनी पत्नी ऐश्वर्या यांना देण्याचे ठरवले. त्यानुसार त्यांनी विवाहानंतर पत्नी ऐश्वर्या यांना पदवीचे शिक्षण घेण्यास प्रेरणा दिली. यावेळी पदवी परीक्षेत पत्नी ऐशर्या यांनी हिंदी विषयात विद्यापीठात प्रथम येण्याचा बहुमान पटकावला होता.त्यानंतर टायपिंग, एमएससीआयटीचे शिक्षण देखील घेतले. पुढे ऐश्वर्या यांनी मंत्रालय लघुलेखक परिक्षा दिली. 

यावेळी पती जितेंद्र यांनी आपली शाळा, मुले सांभाळत पत्नी यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. यामुळे मंत्रालय निम्नश्रेणी लघुलेखक परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात त्यांची मंत्रालयात वर्ग 2 पदी निवड झाली. या संपूर्ण प्रवासात पती जितेंद्र लोकरे यांना दिलेली खंबीर अशी साथ महत्त्वाची ठरली.

1 / 7
2 / 7
3 / 7
4 / 7
5 / 7
6 / 7
7 / 7

विभाग

आमचे वाचक