पशुपालकांसाठी 'पशुसंवर्धन पंधरवडा'



रमजान कराडे - वेदगंगा वार्ता


नानीबाई चिखली 

राज्यातील पशुधनाच्या उत्पादक क्षमतेचा पुरेपुर वापर करुन पशुपालनापासून मिळणाऱ्या उत्पन्नाद्वारे राष्ट्रीय सकल उत्पादनात भर टाकण्याची आवश्यकता आहे. हा विचार घेऊन राज्यात सदर पशुउद्योजकता निर्माण

करण्यासाठी पशुसंवर्धन विभाग कार्यरत आहे. त्यासाठी विभागाकडून उच्च उत्पादन क्षमता असलेल्या वंशावळीची पैदास, पशुस्वास्थ, पशुखाद्य, पशुचारा व व्यवस्थापन या पंचसुत्रीची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यासाठी पशुपालकांमध्ये पंचसुत्री संदर्भात जागृती निर्माण करणे, त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने पशुसंवर्धन विभागामार्फत 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान पशुसंवर्धन पंधरवडा राबविण्यात येत आहे. 


कृषी व्यवसायापासून मिळणाऱ्या एकूण राष्ट्रीय सकल उत्पन्नाच्या 26 टक्के व देशाच्या एकूण राष्ट्रीय सकल उत्पन्नाच्या 4.11टक्के वाटा पशुपालन व्यवसायचाआहे. तथापि पशुपालन व्यवसायामध्ये उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने अधिक क्षमता असून सदर क्षमतेचा पुरेपूर वापर होत नाही. याचा शोध घेतला असता पशुपालकांकडून पशुधनाच्या आरोग्याकडे होत असलेले दुर्लक्ष, पशुधनाची उत्पादकता वाढविण्यासाठी भाकड काळ कमी करणे, उच्च उत्पादन क्षमता असलेल्या प्रजातीच्या वंशावळीत वाढ करण्यासाठी कृत्रिम रेतनाचा अवलंब करण्याबाबत असलेली अनभिज्ञता दिसून येते. 


यासाठी पशुधनाची पूर्ण उत्पादनक्षमता वापरात आणणे, उत्पादन क्षमतेत वाढ करण्याच्या दृष्टीने पशुपालकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याची प्राथमिक गरज आहे. तसेच पशुपालन व्यवसाय फायदेशीर करण्यासाठी प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे. सदर व्यवसाय फायदेशीर करण्यासाठी पशुजन्य पदार्थ तसेच दूध व दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन खरेदी विक्री यासारख्या फॉरवर्ड, बॅकवर्ड लिंकची माहिती पशुपालकांना करून देणे गरजेचे आहे. जेणेकरून पशुपालन व्यवसाय केवळ शेतीपूर्वक अथवा जोडधंदा न राहता तो उत्पन्नाचा मुख्य स्तोत्र होईल. यादृष्टीने पशुपालन उद्योजकता निर्माण करण्यासाठी आवश्यकता आहे. यासाठीच पंचसूत्रीची अंमलबजावणी करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून पशुसंवर्धन पंधरवडा आयोजित केला आहे. 


पशुसंवर्धन पंधरवडा अंतर्गत अंमलबजावणीचे घटक

1. दूध अनुदान योजना राबवताना येणाऱ्या अडचणींचे निराकरण

2. पशुधनाचे शंभर टक्के जंत निर्मूलन व रोगप्रतिबंधक लसीकरण

3. पशुधनास सकस आहार देण्यासाठी प्रोत्साहन 

4. गाई म्हशींची व्यंधत्व तपासणी व उपचार शिबिरांचे आयोजन 

5. राष्ट्रीय पशुधन अभियान योजनांची व्यापक प्रसिद्धी 6. केंद्र शासन राज्य शासनाच्या योजनांची माहिती देणे

7. पशुगणना जनजागृती अभियान

1 / 7
2 / 7
3 / 7
4 / 7
5 / 7
6 / 7
7 / 7

विभाग

आमचे वाचक