तुटलेल्या विद्युत तारांपासून अनमोल जीवन वाचवा - हेमंत येडगे

 अर्जुनी - विद्युत सुरक्षेबाबत आयोजित वीज ग्राहक मेळाव्यात बोलताना मुरगूड महावितरणचे उपकार्यकारी अभियंता हेमंत येडगे यावेळी उपस्थित सरपंच बापूसो यादव, उपसरपंच सुदाम देसाई


        

नानीबाई चिखली 

मुरगूड महावितरणकडून विद्युत सुरक्षेबाबत गावागावात जात मार्गदर्शन करण्यात येत आहे. वादळवाऱे तसेच पावसाळ्याच्या दिवसात तुटलेल्या विद्युत वाहिन्या जीवावर बेतू शकतात. 

त्यामुळे शेतकऱ्यांनी विद्युत वायर कुठे तुटून पडली आहे का याची खात्री करावी. व त्यास स्पर्श न करता तात्काळ जनमित्रांशी संपर्क करून होणारे अपघात टाळत आपले अनमोल जीवन वाचवावे, अशा प्रकारचे आवाहन मुरगूडचे उपकार्यकारी अभियंता हेमंत येडगे यांनी केले. 

यावेळी मुरगूड महावितरण अंतर्गत येत असलेल्या लिंगणूर शाखेच्या वतीने अर्जुनी ( ता. कागल ) येथील सुशिला मगदूम ग्राम वाचनालयामध्ये आयोजित वीज ग्राहकांच्या मेळाव्यात ते बोलत होते. सरपंच बापूसो यादव अध्यक्षस्थानी होते. 

हेमंत येडगे पुढे म्हणाले, शेतकऱ्यांनी शेतवडीमध्ये असणाऱ्या शेती पंपाच्या पेटीला अर्थिंग करून घेतल्यास घडणारे अपघात टाळता येऊ शकतात. तसेच घरामध्ये विविध उपकरणे वापरतअसताना ओल्या हाताने हाताळू नयेत. तसेच प्रत्येकाने आरसीसीबी बसवल्यास पुढील अनर्थ टाळू शकतो.  


यावेळी उपसरपंच सुदाम देसाई,ग्रामस्थ मानसिंग देसाई, चंद्रकांत देसाई, युवराज देसाई, शहाजी देसाई, तुकाराम देसाई, बाजीराव चौगुले, सुरेश देसाई तसेच लिंगणूरचे शाखाधिकारी सुदेश जाधव, सतीश कोळी, युवराज वाघेला, रणजीत बुरुड, पांडुरंग जाधव, मकानदार व ग्रामस्थ उपस्थित होते.

गेल्या काही दिवसामध्ये शेतवडीमध्ये तुटलेल्या विद्युत वाहिन्यांना स्पर्श बसून अपघाती मृत्यू झालेल्यांची संख्या अधिक आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर परिमंडलचे मुख्य अभियंता स्वप्निल काटकर, अधीक्षक अभियंता गणेश लटपटे, कार्यकारी अभियंता दत्तात्रय भणगे यांच्या प्रेरणेने ही मोहीम  राबविण्यात येत आहे. यावेळी ग्रामस्थांकडून या मोहिमेचे विशेष कौतुक होत आहे. 


      



1 / 7
2 / 7
3 / 7
4 / 7
5 / 7
6 / 7
7 / 7

विभाग

आमचे वाचक