नानीबाई चिखली
साडेतीन वर्षांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत मंत्री मुश्रीफ, माजी खासदार संजय मंडलिक, माजी आमदार संजय घाटगे गटाची सत्ता आली होती. सुरवातीची साडेतीन वर्षे मुश्रीफ गटाकडे सरपंचपद व उपसरपंचपद मंडलिक गटाकडे होते. त्यानुसार छाया चव्हाण यांना दीड वर्ष व त्यानंतर अल्लाबक्ष सय्यद यांना सरपंचपदाची संधी मिळाली. तर उपसरपंचपदी सुरवातीला मनिषा पाटील व त्यानंतर विजय घस्ती यांना संधी मिळाली होती.
नानीबाई चिखली ,येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मंडलिक गटाचे युवराज कुंभार यांची तर उपसरपंचपदी मुश्रीफ गटाचे कुमार संकपाळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मावळते सरपंच अल्लाबक्ष सय्यद, उपसरपंच विजय घस्ती यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर ही दोन्ही पदे रिक्त होती. यावेळी मुरगूडचे मंडल अधिकारी प्रशांत गुरव यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले.
यावेळी सरपंच पदासाठी युवराज कुंभार व उपसरपंच पदासाठी कुमार संकपाळ यांचेच अर्ज राहिल्यानंतर त्यांची एकमताने निवड करण्यात आली. सदाशिव तुकान यांनी प्रास्ताविक केले. बिद्रीचे माजी संचालक प्रवीणसिंह भोसले, मावळते सरपंच अल्लाबक्ष सय्यद, आण्णासाहेब शिरगुप्पे यांनी मनोगते व्यक्त केले. यावेळी माजी महिला व बालकल्याण सभापती शिवानी भोसले, प्रकाश वाडकर, कृष्णात डवरी, धीरज मगदूम, विवेक तेली, प्रकाश कुंभार, नंदू तेली, राजेंद्र चौगुले, दिपक देवडकर तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. ग्रामविकास अधिकारी सुर्यकांत कुंभार यांनी आभार मानले.