उत्तम कुंभार आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

उत्तम कुंभार आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

वैद्यकीय शिक्षण मंत्री तसेच पालकमंत्री ना. हसनसो मुश्रीफ यांचेकडून आदर्श शिक्षक पुरस्कार स्विकारताना उत्तम कुंभार

रमजान कराडे - वेदगंगा वार्ता
नानीबाई चिखली ता. 2

हसन मुश्रीफ फाउंडेशन व राष्ट्रवादी शिक्षक सेल यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा आदर्श शिक्षक पुरस्कार येथील चिखली इंग्लिश स्कूल चिखली शाळेतील सहाय्यक शिक्षक उत्तम सखाराम कुंभार यांना देण्यात आला. कागल येथील मटकरी हॉल येथे झालेल्या एका कार्यक्रमात वैद्यकीय शिक्षण मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक सुनीलकुमार लवटे, आमदार जयंत आसगावकर उपस्थित होते.

उत्तम कुंभार हे गेली 25 वर्षे चिखली इंग्लिश स्कूल चिखली शाळेत सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. आपल्या सेवाकाळात त्यांनी भूगोल प्रज्ञाशोध परीक्षा केंद्र नवी मुंबई यांच्याकडून सन 2017, 2019, 2020, 2021, 2022, 2023 सालचा उपक्रमशील शिक्षक म्हणून पुरस्कार पटकावलेला आहे. 2012 पासून इयत्ता दहावी भूगोल विषयाचा निकाल त्यांनी शंभर टक्के लावला आहे. सोबतच त्यांनी आठवीसाठी शिष्यवृत्ती मार्गदर्शक म्हणून काम करताना चार विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक बनवले तर दोन विद्यार्थी नवोदय साठी पात्र ठरले आहेत.दहावी इंग्रजी विषयाचा निकाल देखील त्यांनी शंभर टक्के लावला आहे.

सोबतच शाळा आपल्या दारी, वक्तृत्व स्पर्धा आयोजन आणि परीक्षक म्हणून देखील ते काम करतात. तसेच शालेय स्तरावर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन व निवेदनाचे काम केले आहे. या कामाची दखल घेतच त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. याकामी त्यांना संस्था अध्यक्ष अरूण देवर्षी, सचिव यशवंत तुकान, संचालक अरूण भोसले, धीरज मगदूम यांचे मार्गदर्शन तर मुख्याध्यापक शरद बोरवडेकर तसेच सर्व शिक्षक यांचे सहकार्य लाभले. 

1 / 7
2 / 7
3 / 7
4 / 7
5 / 7
6 / 7
7 / 7

विभाग

आमचे वाचक