'पथदर्शी प्रकल्प' उपक्रमासाठी आपले सरकार सेवा केंद्राची राज्यात निवड

'पथदर्शी प्रकल्प' उपक्रमासाठी आपले सरकार सेवा केंद्राची राज्यात निवड



वेदगंगा वार्ता                                                      नानीबाई चिखली ता. 9

तहसिलदार कार्यालय येथे असणारे आपले सरकार सेवा केंद्र हे सर्वार्थाने आदर्श सेवा केंद्र आहे. केंद्रामध्ये नागरिकांना आवश्यक सेवा, सुविधा, चौकशी व मार्गदर्शन कक्ष उत्तम आहे. त्यामुळे हे केंद्र राज्यात आदर्श असल्याचे प्रतिपादन राज्य आयुक्त सेवा हक्क आयोग पुणे महसूल विभागचे दिलीप शिंदे यांनी काढले.

कागल तहसिलदार कार्यालयातील आपले सरकार सेवा केंद्राची ( सेतू ) 'पथदर्शी प्रकल्प' उपक्रमासाठी महाराष्ट्र राज्यातून एकमेव निवड करण्यात आले. यावेळी भेटीदरम्यान ते बोलत होते. 

केंद्रात आयोगाने सुचवलेल्या टाईप प्लॅन प्रमाणे आदर्श आपले सरकार सेवा केंद्राची निर्मिती केली आहे. केंद्रा मध्ये नागरिकांना बैठक व्यवस्था, रॅम्पची व्यवस्था आहे. तसेच सुचना फलक, केंद्रातील सर्व दप्तर अद्यावत असे असून कर्मचाऱ्यांना ड्रेस कोड, ओळखपत्र देण्यात आले आहे.

यासाठी कोल्हापूरचे निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, कागल तहसीलदार अमरदिप वाकडे, निवासी नायब तहसीलदार रूपाली सुर्यवंशी, महसूल नायब तहसीलदार डाॅ. अर्चना कुलकर्णी, निवडणूक नायब तहसीलदार विनय कौलवकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. सेतू व्यवस्थापक अनिल भोसले यांनी प्रास्ताविक केले. यावेळी अस्मिता कांबळे, तृप्ती सणगर, संजना सणगर, शितल ढोबळे उपस्थित होते. नितिन मायने यांनी आभार मानले.

कागलचे पोलीस निरीक्षक अवधूत लोहार, संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष प्रताप उर्फ भैय्या माने, नगरसेवक संजय चित्तारी, अमित पिष्ठे यांनी सेतू केंद्रास भेट देऊन शुभेच्छा दिल्या.

1 / 7
2 / 7
3 / 7
4 / 7
5 / 7
6 / 7
7 / 7

विभाग

आमचे वाचक