नानीबाई चिखलीतील आजी - माजी सैनिकांनी राबवली स्वच्छता मोहीम

नानीबाई चिखलीतील आजी - माजी सैनिकांनी राबवली स्वच्छता मोहीम

नानीबाई चिखली - स्वागत कमानीजवळ राबविलेल्या स्वच्छता मोहिमेत सहभागी आजी माजी सैनिक

वेदगंगा वार्ता                                                      नानीबाई चिखली ता. 14

गावच्या दक्षिणेला असलेल्या स्वागत कमानी जवळ येथील आजी माजी सैनिक असोसिएशनच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. सामाजिक बांधिलकी जपत नेहमीच सामाजिक कार्यात आघाडीवर असलेल्या सैनिक असोसिएशनने राबविलेल्या या मोहिमेचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

ऐन उमेदीच्या काळात देशाच्या सीमेवर कुटुंबापासून दूर राहत देशसेवेचे व्रत जोपासलेल्या येथील आजी माजी सैनिक असोसिएशनने सुमारे 9 वर्षापुर्वी एक नवा अध्याय आपल्या कृतीतून घडवून आणला होता. सुमारे 4 लाख रूपये खर्च करीत असोसिएशनने गावच्या दक्षिण दिशेस सुंदर अशी स्वागत कमान उभी केली होती. गावच्या प्रवेशद्वारात उभी केलेली ही कमान गावच्या सौंदर्यात भर घालतेच शिवाय कमान इतरांसाठी प्रेरणादायी ही ठरली आहे. 

अशा या स्वागत कमानीजवळ वाढलेले गवत, झाडे, झुडपे यामुळे कमानीजवळचा परिसर अस्वच्छ दिसत होता. याचाच विचार करीत दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सैनिक असोसिएशनने या परिसराची स्वच्छता घडवून आणली. यावेळी आजी माजी सैनिक असोसिएशनचे अध्यक्ष बाजीराव पोवार, उपाध्यक्ष विजय पाटील तसेच सैनिक दूध संस्थेचे सभापती वसंत देवडकर, उपसभापती मारूती पोवार, सल्लागार बाळकृष्ण संकपाळ, संचालक बाळकृष्ण चव्हाण, विजय लोहार, लक्ष्मण कांबळे, अण्णाप्पा वाडकर आदी माजी सैनिक उपस्थित होते.



1 / 7
2 / 7
3 / 7
4 / 7
5 / 7
6 / 7
7 / 7

विभाग

आमचे वाचक