नानीबाई चिखलीच्या उपसरपंचपदी जयश्री गळतगे

नानीबाई चिखलीच्या उपसरपंचपदी जयश्री गळतगे

 


वेदगंगा वार्ता                                                      नानीबाई चिखली ता. 4

येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी मुश्रीफ गटाच्या जयश्री महादेव गळतगे यांची 9 विरूद्ध 3 मतांनी निवड झाली. सरपंच युवराज कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामविस्तार अधिकारी सुर्यकांत कुंभार होते. 

कुमार संकपाळ यांनी आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त होते. मंगळवारी उपसरपंच निवडीसाठी विशेष सभा घेण्यात आली. यावेळी उपसरपंच पदासाठी जयश्री गळतगे व साधना जाधव असे दोन अर्ज आले होते. हात वर करून घेण्यात आलेल्या मतदानामध्ये जयश्री गळतगे यांच्या बाजूने 9 सदस्यांनी तर विरोधात असलेल्या साधना जाधव यांच्या बाजूने 3 सदस्यांनी हात वर केला. तर एक सदस्य गैरहजर राहिले होते. 

यावेळी बिद्रीचे माजी संचालक प्रवीणसिंह भोसले, कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या माजी महिला व बालकल्याण समिती सभापती शिवानी भोसले, संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य सदाशिव तुकान, सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच पांडूरंग गळतगे, प्रकाश वाडकर, महेश गळतगे, सचिन सुर्यवंशी, बाबूराव वाडकर, बुरहान सय्यद, दिपक देवडकरआदी उपस्थित होते. माजी सरपंच अल्लाबक्ष सय्यद यांनी आभार मानले. 


उपसरपंच पदी निवड झालेनंतर अभिनंदन करताना संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य सदाशिव तुकान यावेळी    सरपंच युवराज कुंभार व इतर मान्यवर




1 / 7
2 / 7
3 / 7
4 / 7
5 / 7
6 / 7
7 / 7

विभाग

आमचे वाचक