कागल तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या चेअरमनपदी बाळनाथ डवरी
रमजान कराडे - वेदगंगा वार्ता नानीबाई चिखली ता. 10
कागल तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या चेअरमनपदी येथील बाळनाथ कृष्णात डवरी यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीच्या वेळी अध्यक्षस्थानी ए. आर. ऑफीस कागलचे प्रतिनिधी शिंदे साहेब होते. चेअरमन निवडीसाठी आज कागल येथील मुख्य शाखेत विशेष सभा बोलविण्यात आली.
संचालक रघुनाथ जाधव यांनी चेअरमनपदासाठी बाळनाथ डवरी यांचे नाव सुचवले तर भीमराव कोगले यांनी त्यास अनुमोदन दिले. यावेळी मावळते चेअरमन बाळासाहेब पवार, प्राथमिक शिक्षक बँक कोल्हापूरचे माजी चेअरमन जी. एस. पाटील, माजी व्हाईस चेअरमन वसंतराव जाधव, कोल्हापूर पुरोगामी शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष एस. के. पाटील, तालुका अध्यक्ष आनंदा मालवेकर, माजी चेअरमन शिवाजी पाटील, पांडुरंग रावण, उमाजी कांबळे, विद्यमान व्हाईस चेअरमन विजया चव्हाण, संचालक सुनिता कांबळे, तुकाराम राजुगडे, आनंदा साळुंखे, कृष्णात विष्णू पाटील, उत्तम पाटील तसेच सचिव किरण पाटील आदी उपस्थित होते.
![]() |
नुतन चेअरमन बाळनाथ डवरी यांचा सत्कार करताना पतसंस्थेचे संचालक व मान्यवर मंडळी |
... शिक्षक पतसंस्थेच्या च्याव्या चिखलीकरांच्या हातात कागल तालुक्यातील प्राथमिक शिक्षक पतसंस्थेची शिखर संस्था म्हणून सर पिराजीराव प्राथमिक शिक्षक पतपेढी व कागल तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्था यांचेकडे पाहिले जाते. गेल्याच महिण्यात सर पिराजीराव पतपेढीचे चेअरमन म्हणून किशोर जाधव यांची निवड झाली होती. आता कागल प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन म्हणून बाळनाथ डवरी यांची निवड झाली. यामुळे आता तालुक्यातील शिक्षक पतसंस्थेच्या च्याव्या चिखलीकरांच्या हातात आल्याचा हा दुर्मिळ योगायोग यानिमित्ताने पहायला मिळाला.