नानीबाई चिखलीनजीक वेदगंगेत आढळला अनोळखी मृतदेह
वेदगंगा वार्ता नानीबाई चिखली ता. 26
नानीबाई चिखली ( ता. कागल ) येथील वेदगंगा नदीपात्रात अनोळखी अंदाजे 50 वर्षीय पुरुषाचा मृतदेह आढळला आहे. मुरगुड पोलिसांमध्ये या घटनेची नोंद झाली असून येथील पोलिसांनी हा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ताब्यात घेतला आहे. हा घातपात आहे की आत्महत्या याचा छडा लावण्याचे आव्हान मुरगूड पोलिसांसमोर असल्याचे घटनास्थळी चर्चा सुरू होती.
याबाबत अधिक माहिती आज गुरुवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास शेतकऱ्यांना वेदगंगा नदीच्या पाण्यावर दक्षिण तीराला मृतदेह शामराव सांळुखे यांच्या गट क्रमांक १४९ मध्ये तरंगताना दिसला. त्यांनी तात्काळ पोलिस पाटील अमृता कांबळे यांना कळविले. कांबळे यांनी मुरगूड पोलिसांना माहिती दिली.अधिक तपास पोलिस काँन्सटेबल पाटील हे करत आहेत.