अनिल भोसले यांनी केला देहदानाचा संकल्प

अनिल भोसले यांनी केला देहदानाचा संकल्प                    वाढदिवसाला केली घोषणा, समाजासाठी प्रेरणादायी पाऊल

  अनिल भोसले यांचा सत्कार करताना जिल्हा परिषदचे वित्त  व लेखा अधिकारी अतुल आकुर्डे यावेळी मान्यवर

वेदगंगा वार्ता                                                        नानीबाई चिखली ता. 23

दलित महासंघाचे कागल तालुकाध्यक्ष असलेले येथील अनिल धोंडीराम भोसले यांनी आपला पन्नासावा वाढदिवस नुकताच साजरा केला. यावेळी वाढदिवसानिमित्त त्यांनी मरणोत्तर देहदानाचा संकल्प जाहीर केला. त्यांचा संकल्प समाजासाठी प्रेरणादायी असून त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

मुळचे चिखलीचे असलेले अनिल भोसले सध्या कागल येथे राहतात. लहानपणापासूनच त्यांनी सामाजिक कार्यात आपला ठसा उमठवलेला आहे. ते सध्या कागल तहसिलदार कार्यालय येथे शाहू सुविधा केंद्रात व्यवस्थापक म्हणून ते काम करतात. केंद्राच्या माध्यमातून नेहमीच त्यांनी गरजूंना मदत करीत समाजाशी बांधिलकी जपली आहे. यापूर्वी 39 व्या वाढदिवसालाही त्यांनी नेत्रदान करण्याचा संकल्प केला आहे. 

आपल्या 50 व्या वाढदिवसानिमित्त त्यांनी मरणोत्तर देहदानाचा संकल्प जाहीर केला तेंव्हा पत्नी वृषाली, मुलगी अनुश्री, मुले तन्मय व चिन्मय यांनी देखील त्यास पाठिंबा दिला. संकल्प जाहिर करण्यापुर्वी त्यांनी राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर येथे जात आवश्यक कागदपत्रांची पूर्तताही केली. 

या स्तुत्य संकल्पामुळे वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मोठी मदत होणार आहे. यावेळी जिल्हा परिषद वित्त व लेखा अधिकारी अतुल आकुर्डे, प्रकाश तिराळे, अमित पिष्टे, अनिल पवार, अमर आपटे, प्रमोद काटकर आदींच्या उपस्थित यांचा सत्कार करण्यात आला. 

1 / 7
2 / 7
3 / 7
4 / 7
5 / 7
6 / 7
7 / 7

विभाग

आमचे वाचक