माध्यमिक विद्यालय डेगवे येथे संगणक कक्षचे उद्घाटन
![]() |
डेगवे - संगणक कक्षाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमोद कामत यावेळी सरपंच राजन देसाई, माजी उपसरपंच मधुकर देसाई, सोसायटी चेअरमन प्रविणभाई देसाई |
अनिल मगदूम - वेदगंगा वार्ता सावंतवाडी ता. 14
विद्यार्थ्यांना आपले करिअर चांगल्या प्रकारे करावयाचे असेल तर त्यांनी अपार कष्ट आणि मेहनत घ्यायला हवी. आपल्या परिस्थितीची जाणीव ठेवत स्व मेहनत केली असता त्यांना निश्चितच यशाचे उत्तुंग शिखर गाठता येत असल्याचे प्रतिपादन माजी आरोग्य व शिक्षण सभापती प्रमोद कामत यांनी केले.
धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ मुंबईचे माध्यमिक विद्यालय डेगवे येथे संस्था, पालक व लोकसहभागातून साकार झालेल्या संगणक कक्षाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सरपंच राजन देसाई, माजी उपसरपंच मधुकर देसाई, माजी उपसरपंच तथा सोसायटी चेअरमन प्रविणभाई देसाई, सरस्वती चुडे प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रेमानंद देसाई, श्री स्थापेश्वर मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य उपस्थित होते.
प्रशालेचे प्रभारी मुख्याध्यापक एस.के. सावंत यांनी प्रास्ताविक केले. प्रेमानंद देसाई, उत्तम देसाई, मधुकर देसाई, सरपंच राजन देसाई, माजी पंचायत समिती सभापती भगवानराव देसाई यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी श्री. स्थापेश्वर मंदिर ट्रस्ट मार्फत गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप, इयता दहावी, बारावी मध्ये प्रथम तीन क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले. तसेच सरस्वती चुडे प्रतिष्ठान, ग्रामपंचायत डेगवे व विविध कार्यकारी सोसायटी डेगवे मार्फत देखील इयता दहावी आणि बारावी मध्ये प्रथम तीन क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले. यावेळी शालेय समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, सर्व पालक व असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन यशदा देसाई यांनी केले. अनिल मगदूम यांनी आभार मानले.