ट्रक - बोलेरो धडकेत सोळांकूरच्या तिघांचा मृत्यू सरवडे येथे अपघात, चौघे गंभीर जखमी
![]() |
अपघातात चक्काचूर झालेली बोलेरो गाडी |
वेदगंगा वार्ता नानीबाई चिखली ता. 11
राधानगरी तालुक्यातील सरवडे - मांगेवाडी हद्दीतील सूर्यवंशी चव्हाण मळ्याजवळ ट्रक आणि बोलेरो गाडीमध्ये झालेल्या भीषण अपघातात तीन युवकांचा मृत्यू झाला असून, चारजण गंभीर जखमी झाले आहेत. शुभम धावरे, रोहन लोहार, आकाश परीट अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. ऐन गणेशोत्सवात तीन युवकांचा दुर्दैवी मृत्यू झालेने सोळांकूर परिसरात शोककळा पसरली आहे.
अपघातानंतर फिर्यादी राजेंद्र मनोहर लोहार यांनी अज्ञात ट्रक चालकाविरोधात फिर्याद दाखल केली आहे. पोलीस तपास पोलीस हवालदार अंबुलकर यांनी अपघाताची नोंद घेतली असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश घेरडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. अज्ञात ट्रक चालकाने बेदरकारपणे वाहन चालवून अपघात केल्यानंतर कोणतीही मदत न करता घटनास्थळावरून पळ काढल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत.