रांगोळी स्पर्धेत साक्षी शिंदे प्रथम
![]() |
रांगोळी स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेत्या साक्षी शिंदे हिला बक्षिस देताना नविद मुश्रीफ यावेळी प्रवीणसिंह भोसले, सदाशिव तुकान |
येथील एकता तरुण मंडळ यांच्या वतीने गणेश उत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेत साक्षी अजित शिंदे हिने प्रथम क्रमांक पटकावला. संदीप वडगुले याच्या स्मरणार्थ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
स्पर्धेचे उद्घाटन मंडळाचे अध्यक्ष सचिन सूर्यवंशी यांनी केले. यावेळी द्वितीय क्रमांक श्रेया विजय संकपाळ, आदिती सचिन खरबुडे तर तृतीय ऐश्वर्या धनंजय पवार, सुरभी सुरेश पाटणकर यांना विभागून देण्यात आला.उत्तेजनार्थ म्हणून स्वप्नाली दिपक कोरे, श्वेता अविनाश पोतदार, तनिष्का सुधाकर बेनाडे यांना देण्यात आला.
बक्षीस वितरण गोकुळचे संचालक नविद मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बिद्रीचे माजी संचालक प्रवीणसिंह भोसले, सदाशिव तुकान, माजी सरपंच अल्लाबक्ष सय्यद, श्रीशैल नुल्ले, महमद मुल्लानी, आण्णासो वडगुले, बाजीराव वाडकर, राजेंद्र चौगुले, वैभव गळतगे आदी उपस्थित होते. अनिल मगदूम, प्रा. अजित डवरी, सुनील मार्तंड, नजीर नाईक यांनी परीक्षक म्हणून काम केले. बशीर नदाफ यांनी आभार मानले.
![]() |
प्रथम क्रमांक विजेत्या साक्षी शिंदे हिने रेखाटलेली रांगोळी |