कागलला राष्ट्रीय महामार्गावर नवीन फ्लायओव्हर मंजूर

कागलला राष्ट्रीय महामार्गावर नवीन फ्लायओव्हर मंजूर

                



वेदगंगा वार्ता                                                      नानीबाई चिखली ता. 16

कागल बस स्थानकाजवळ राष्ट्रीय महामार्गावर अरुंद बोगद्यामुळे वाहतुकीच्या कोंडीसह अपघाताची संख्याही वाढली होती. यावर इलाज म्हणून कागल शहर कृती समितीने बोगद्याऐवजी पिलरच्या फ्लायओव्हरची मागणी केली होती. आता रस्त्याच्या सहा पदरीकरणांमध्ये जुना बोगद्याचा अंडरपासिंग काढून टाकून एक किलोमीटर लांबीचा फ्लायओव्हर मंजूर झाला आहे. कागल शहर कृती समितीचे अध्यक्ष व केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

श्री. माने यांनी दिलेली अधिक माहिती अशी, प्रताप उर्फ भैया माने यांच्या अध्यक्षतेखालील कृती समितीने या प्रश्न आवाज उठवून पाठपुरावा केला होता. पालकमंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी केंद्रीय रस्ते व अवजड वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी यांची भेट घेऊन आणि पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला होता. या नवीन सुधारित पुलाला राष्ट्रीय रस्ते विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष संतोष यादव यांनी मंजुरी दिल्याचे श्री. माने यांनी यावेळी सांगितले. या कामी राष्ट्रीय केंद्रीय रस्ते व अवजड वाहतूक मंत्री नामदार नितीनजी गडकरी, पालकमंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ, जिल्हाधिकारी अमोल येडगे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक वसंत पंदरकर यांचे सहकार्य झाल्याचेही त्यांनी सांगितले. 

यावेळी कृती समितीचे उपाध्यक्ष संजय ठाणेकर, माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, प्रवीण काळबर, सुनील माळी, सतीश घाडगे, असलम मुजावर, संग्राम लाड, नितीन दिंडे, नवल बोते आदी प्रमुख उपस्थित होते.

एक किलोमीटर लांबीच्या या नवीन फ्लायओव्हरचा उपयोग पुढीलप्रमाणे होणार आहे.

● वाहतुकीची कोंडी कायमची सुटणार. ● कर्नाटकातून येणारी वाहने, रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या शेतीमधून कागलमधील साखर कारखान्यांना होणारी ऊस वाहतूक सुरळीत होईल. ● स्थानिक बस वाहतूक, रिक्षा व वडाप ही वाहतूकसुद्धा सुरळीत होईल व अपघात टळतील. ● कागल मुख्य शहरासह उपनगरांचा पूर्वेकडील भाग. तसेच; मौजे सांगाव, कसबा सांगाव, रणदिवेवाडी या गावांना कोल्हापूरच्या दिशेने राष्ट्रीय महामार्गावर येण्यासाठी सुलभ.      

 


1 / 7
2 / 7
3 / 7
4 / 7
5 / 7
6 / 7
7 / 7

विभाग

आमचे वाचक