चिकोत्राच्या पाण्यावर आकर्षक विद्युत रोषणाई

चिकोत्राच्या पाण्यावर आकर्षक विद्युत रोषणाई 


आकर्षक विद्युत रषणाईने सजलेले चिकोत्रा धरण

 दत्ता पाटील - वेदगंगा वार्ता                                     म्हाकवे ता. 15

चिकोत्रा खोऱ्याची जीवनदायीनी बनलेल्या चिकोत्रा धरणाच्या पाण्यावर आकर्षक विद्युत रोषणाईतून तिरंगा अभिमानाने डौलत आहे. गेल्या पाच वर्षापासून हे धरण पूर्ण क्षमतेने भरत आहे. त्यामुळे 35 गावात आनंद लहरी उमटत आहेत. आणि याचाच भाग म्हणून प्रशासनाने स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर या धरणाच्या विसर्गाच्या पाण्यावर आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे.

       धरणाच्या उभारणीपासून केवळ दीड टीएमसी क्षमतेचे हे धरण 17 वर्षात केवळ तीन वेळाच भरले आहे. तर 2015 मध्ये प्रशासन आणि चिकोत्रा खोऱ्यातील नागरिकांच्या प्रयत्नांतून म्हातारीच्या पठारावरील वाया जाणारे पाणी कट्टा घालून ते धरणात वळविल्यामुळे हे धरण पूर्ण क्षमतेने भरत आहे. यामुळे कोरडवाहू असणाऱ्या या खोऱ्यातील शेतीचे नंदनवन झाले आहे. 

     झुलपेवाडी धरणाच्या आश्वासकतेमुळे चिकोत्रा खोऱ्यातील नागरिकांसह शेतकरी आनंदीत झाला आहे. प्रशासनाने केलेल्या आकर्षक विद्युत रोषणाई कौतुकाचा विषय बनला असून नागरिकांमध्ये चैतन्य फुलले आहे.

पहिल्यांदाच आँगस्टमध्ये धरण भरले                         गतवर्षी यंदा ३० टक्के पाणीसाठा शिल्लक राहिल्याने यंदा धरण लवकर भरण्यास मदत झाली आहे. तसेच यंदा 1 जुनपासुन आजपर्यंत 2 हजार 356 मि. मी. पाऊस झाल्याने यंदा पहिल्यांदाच आँगस्टच्या पहिल्या आठवड्यात हे धरण भरले आहे.

1 / 7
2 / 7
3 / 7
4 / 7
5 / 7
6 / 7
7 / 7

विभाग

आमचे वाचक