वक्तृत्व स्पर्धेत ईशा देवडकर, आराध्या सुतार, रेणुका पाटील प्रथम

वक्तृत्व स्पर्धेत ईशा देवडकर, आराध्या सुतार, रेणुका पाटील प्रथम                                                                

प्राथमिक शिक्षक समितीतर्फे आयोजन, तीनशे स्पर्धकांचा सहभाग

प्राथमिक शिक्षक समितीतर्फे आयोजित वक्तृत्व स्पर्धेत विजेत्या स्पर्धकांसह शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद तौंदकर, गणपती माडवकर, अरविंद पाटील व इतर

वेदगंगा वार्ता                                                      नानीबाई चिखली ता. 4

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा कागल यांचे वतीने उदय दत्तू कोळी यांच्या स्मरणार्थ इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्या मंदिर मुरगुड नं. 2 येथे पार पडलेल्या स्पर्धेत ईशा देवडकर ( म्हाकवे ), आराध्या सुतार ( बोरवडे ), व रेणुका पाटील ( केनवडे ) यांनी अनुक्रमे आपआपल्या गटात प्रथम क्रमांक पटकावला. 

 स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे                                    इयत्ता पहिली व दुसरी गटात द्वितीय आरोही अमित काईत     ( चिखली ), तृतीय स्वराज सागर कळमकर ( मळगे बुद्रुक ) यांनी तर इयत्ता तिसरी ते पाचवी गटात द्वितीय स्वरा कृष्णात हासोळे ( हमिदवाडा ), राजवर्धन प्रकाश एकशिंगे ( केनवडे ) यांनी तसेच सहावी ते सातवी गटात द्वितीय संस्कार ज्ञानदेव येलकर ( बेलेवाडी काळम्मा ), तृतीय आराध्या सुर्यकांत खेडे  ( आनुर ) यांनी अनुक्रमे क्रमांक पटकावला. 

तालुकाध्यक्ष अरविंद पाटील यांनी प्रास्ताविक केले. बक्षिस वितरण जिल्हाध्यक्ष प्रमोद तौंदकर, कार्याध्यक्ष गणपती माडवकर, शिवाजी बोलके, एकनाथ आजगेकर, तुकाराम मातले, तानाजी तारदाळे, डि. एम. कुंभार, सदानंद कांबळे, काकासो पाटील आदींच्या हस्ते करण्यात आले. परिक्षक म्हणून आर. पी. वारके, प्रा. कृष्णामाई कुंभार, उज्ज्वला सातपुते, सात्ताप्पा शेरवाडे, संजय जितकर व विकास पाटील यांनी काम पाहिले. श्रीकांत गायकवाड यांनी सुत्रसंचालन केले. बाबुराव चव्हाण यांनी आभार मानले. 

 छप्पर फाडके प्रतिसाद...                                        कागल तालुक्यातील जिल्हा परिषद व कागल नगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आयोजित स्पर्धेत पहिल्याच वर्षी विद्यार्थ्यांनी छप्पर फाडके प्रतिसाद दिला. इयत्ता पहिली ते सातवीच्या सुमारे 300 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र तसेच विजेत्यांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आली. रोख रकमेची बक्षिसे आनंदा जाधव यांनी तर सन्मानचिन्ह विजय गंगापूरे यांनी दिली. 

1 / 7
2 / 7
3 / 7
4 / 7
5 / 7
6 / 7
7 / 7

विभाग

आमचे वाचक