उघड्यावर पडलेल्या गणेशमुर्तींचे पुन्हा केले विधीवत विसर्जन

उघड्यावर पडलेल्या गणेशमुर्तींचे पुन्हा केले विधीवत विसर्जन

वेदगंगा नदीकाठावर उघड्यावर पडलेल्या मुर्तीचे विधीवत पुन्हा विसर्जन करताना हुतात्मा हरीबा बेनाडे मंडळाचे सदस्य

रमजान कराडे - वेदगंगा वार्ता                                  नानीबाई चिखली ता. 18

येथील वेदगंगा नदीपात्रात गणेशभक्तांनी घरगुती गणपतीचे विसर्जन केले होते. मात्र नदीतील पाणी कमी झाल्यामुळे विसर्जन केलेल्या गणेशमूर्ती उघड्यावर पडलेल्या होत्या. यावेळी सामाजिक जबाबदारीचे भान ठेवत येथील हुतात्मा हरीबा बेनाडे तरूण मंडळाच्या सदस्यांनी पुढाकार घेत उघड्यावर पडलेल्या शेकडो गणेशमुर्त्या एकत्र करीत त्या नदीच्या खोल पात्रात जात त्यांचे विधीवत पुन्हा विसर्जन केले.

नुकताच गणेशोत्सव मोठ्या उत्साहात तसेच आनंदी वातावरणात पार पडला. येथील गणेशभक्तांनी सहा दिवस मनोभावे सेवा करत आपल्या लाडक्या बाप्पाला विसर्जन करत निरोप दिला. यावेळी ग्रामपंचायतीने गणेशभक्तांना मुर्ती दान तसेच निर्माल्य दान करण्याचे आवाहन केले होते. कांही प्रमाणात त्यांना यामध्ये यश देखील आले. तर काही गणेशभक्तांनी वेदगंगा नदीपात्रात मोठ्या उत्साहात घरगुती गणेशमुर्तीचे विसर्जन केले होते.

विसर्जन करतेवेळी नदीला पाणी जास्त होते. मात्र काठोकाठ भरलेल्या वेदगंगा नदीची पाणी पातळी खालावल्याने विसर्जीत केलेल्या मुर्ती उघड्यावर पडलेल्या पहायला मिळाल्या. यावेळी हुतात्मा हरीबा बेनाडे तरूण मंडळाचा गणपती विसर्जीत करीत असताना सदस्यांना या मुर्त्या नजरेस पडल्या.क्षणाचाही विचार न करता त्यांनी सामाजिक जबाबदारीचे भान ठेवत सर्व मुर्त्या एकत्र केल्या. व खोल पाण्यात जात त्या मूर्तींचे पुन्हा विधीवत विसर्जन केले. 


यावेळी मंडळाचे अध्यक्ष ओमकार पोतदार, अर्जुन संकपाळ, आशुतोष पोतदार, अविनाश पोतदार, प्रणव खरबुडे, सौरभ शेट्टी, जितेंद्र उपाध्ये, सुभाष स्वामी, अजिंक्य मुरगुडे, विजय स्वामी, प्रल्हाद खोंद्रे, सार्थक उपाध्ये, पुष्कर उपाध्ये, कृष्णात मगदूम, सुरज पाटील अनिल शेट्टी यांचे अनमोल सहकार्य लाभले. यावेळी सरपंच युवराज कुंभार तसेच सदस्य व ग्रामस्थ यांनी संबंधित मंडळाचे कौतुक केले. 

1 / 7
2 / 7
3 / 7
4 / 7
5 / 7
6 / 7
7 / 7

विभाग

आमचे वाचक