नानीबाई चिखलीतील दोन मोटरसायकली चोरीला
वेदगंगा वार्ता नानीबाई चिखली ता. 23
येथे रविवारी रात्री दोन दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला. रविवारी सायंकाळी झालेल्या जोरदार पाऊसामुळे गावातील वीज पुरवठा बंद होता. अंधाराचा फायदा घेत चोरट्यांनी या दुचाकी लांबविल्या. चोरीची नोंद मुरगूड पोलीसात झाली आहे.
पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, अजित पिसाळ यांची सिल्वर रंगाची स्पेंल्डर प्लस मोटरसायकल ( एम.एच.०९ इ झेड ४१४७) घरासमोरील दारात लावलेली होती. तर शिवाप्पा गाळेप्पा लमाणी ( मूळ गाव नेलोगल जि. गदग रा. कर्नाटक ) सध्या चिखली येथे राहत असून त्यांची त्यांचीही काळ्या रंगाची स्पेंल्डर मोटरसायकल ( के.ए.२६ इ ५४४५) दारात लावलेली होती. या दोन्ही मोटरसायकली रविवारी ( ता.२२ ) रात्री १२ ते सकाळी ६ दरम्यान चोरट्यांनी चोरुन पोबारा केला. चोरीची फिर्याद अजित शामराव पिसाळ यांनी मुरगूड दिली आहे. अधिक तपास मुरगूड पोलीस करीत आहेत.
दरम्यान, गेल्या काही दिवसापासून चिखली व परिसरातील चोरीच्या घटनात वारंवार वाढ होताना दिसत आहे. वेदगंगा नदीकाठी संगमाजवळ विद्युत मोटारींच्या केबल चोरी सोबत आता दुचाकी चोरल्या जात असल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे.