श्रावण महिन्यामध्ये यंदा पाच सोमवार

नानीबाई चिखली ता. 6



हिंदू धर्मातील बारा महिन्यातील एक असलेल्या श्रावण

महिन्याला विशेष महत्त्व आहे. सनातन हिंदू धर्मात श्रावण महिना अत्यंत पवित्र मानला जातो. यंदाच्या श्रावणात प्रथमच पाच श्रावण सोमवार येत आहेत. यामुळे भाविकांसाठी ही मोठी पर्वणी ठरणार आहे. मागच्या वर्षी २०२३ मध्ये अधिक मासाचे दोन महिने आले होते. या काळात एकूण आठ श्रावण सोमवार पडले होते.

यंदा ७२ वर्षांनंतर प्रथमच सोमवारी श्रावण सुरू व सोमवारीच श्रावणाची सांगता असा दुर्मिळ योग येत आहे. यापूर्वी असा योग १९५३ मध्ये आला होता. श्रावण महिना हिंदू धर्मात अंत्यत पवित्र मानला जातो. या महिन्यात महादेव-पार्वतीची पूजा करण्यासाठी भाविक पहाटे तीनपासूनच तयार असतात. ही पूजा केल्याने सर्व अपेक्षा परिपूर्ण होतात, अशी भाविकांची धारणा आहे.

भारतातील उत्तरेकडे पौर्णिमेपासून ( २२ जुलै २०२४ ) श्रावण सुरू झाला असून तो १९ ऑगस्ट २०२४ रोजी संपणार आहे. याउलट आपल्याकडे अमावस्या ( ता.५ ऑगस्ट २०२४ ) ला श्रावण सुरू झाला आहे, तर २ सप्टेंबर २०२४ रोजी श्रावणाची अमावस्येच्या दिवशी सांगता होणार आहे. या पाच सोमवारचा हा दुर्मिळ योगायोग तब्बल ७२ वर्षांनंतर येत आहे. यापूर्वी १० ऑगस्ट १९५३ ला सोमवारी श्रावणाची सुरुवात झाली होती, तर ८ सप्टेंबर १९५३ रोजी पाचव्या श्रावणाने सोमवारची सांगता झाली होती.


    पाच श्रावण सोमवार   

* पहिला श्रावण सोमवार ५ ऑगस्ट

* दुसरा श्रावण सोमवार १२ ऑगस्ट

* तिसरा श्रावण सोमवार १९ ऑगस्ट

* चौथा श्रावण सोमवार २६ ऑगस्ट 

* पाचवा श्रावण सोमवार २ सप्टेंबर

1 / 7
2 / 7
3 / 7
4 / 7
5 / 7
6 / 7
7 / 7

विभाग

आमचे वाचक