![]() |
प्रा. रमेश कुंभार |
वेदगंगा वार्ता
नानीबाई चिखली ता. 8
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांचे मार्फत एप्रिल 2024 मध्ये घेण्यात आलेल्या सेट परीक्षेमध्ये अर्जुननगर ( ता. कागल ) येथील देवचंद कॉलेजचे प्रा. रमेश सुरेश कुंभार हे राज्यशास्त्र विषयातून उत्तीर्ण झाले. त्यांच्या या परीक्षेतील यशासाठी जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आशिष शाह, उपाध्यक्षा डॉ. तृप्ती शाह, महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रो. डॉ. जी. डी. इंगळे, इतिहास विभाग प्रमुख डॉ. सी. एम. नाईक तसेच राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सुजाता पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.