कै. रावसाहेब भोसले दूध संस्थेकडून 23 लाख रूपयांचे फरक बील वाटप

कै. रावसाहेब भोसले दूध संस्थेकडून 23 लाख रूपयांचे फरक बील वाटप

 कै. रावसाहेब भोसले दूध संस्थेमार्फत सर्वात जास्त दुध पुरवठा केलेल्या अजित पिसाळ यांचा सत्कार करताना विवेक चाबुकस्वार यावेळी सरपंच युवराज कुंभार व इतर

वेदगंगा वार्ता
नानीबाई चिखली ता.10
दूध उत्पादकांच्या दूधास योग्य मोबदला मिळावा यासाठी अत्यंत काटकसरीचा कारभार करीत उच्चांकी असे फरक बील वाटपाची परंपरा येथील कै. रावसाहेब भोसले दूध संस्थेने जपली आहे. यावर्षी संस्थेने दूध उत्पादकांना फरक बिल, दूध बिल, मेंबर ठेव यासहित विक्रमी असे 23 लाख 27 हजार रूपयांचे वाटप करीत दूध उत्पादकांची विश्वासार्हता जपली.     

अवघ्या सहा, सात वर्षापूर्वी स्थापन झालेल्या संस्थेचे दररोजचे संकलन 800 लिटर दूध इतके आहे. वर्षभरानंतर संस्थेने उत्पादकांना त्यांच्या घामाचा मोबदला देण्यासाठी इतर संस्थापेक्षा जादा टक्केने फरक काढला आहे. म्हैस दूधास शेकडा रूपये 13.75 प्रमाणे 5 लाख 25 हजार, गाय दूधास शेकडा रूपये 13.15 टक्केप्रमाणे 8 लाख 9 हजार, याचबरोबर सभासद ठेव रूपये 7 लाख 51 हजार तर आठवडा दूध बिलाचे 2 लाख 40 हजार असे एकूण 23  लाख  27  हजार रूपयांचे वाटप केले.
       
तसेच संस्थेला सर्वात जास्त गाय विभागामध्ये दूध पुरवठा केलेले अनुक्रमे सुनिता पिसाळ, युवराज पाटील, विनायक हेब्बाळे, पंडित कोंगनुळे तर म्हैस विभागामध्ये मेघा कुंभार, अलका आरगे, सविता मगदूम व उज्वला निकम आदींचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते चषक देत करण्यात आला. 

सचिव विजय घस्ती यांनी प्रास्ताविक केले. यावेळी सरपंच युवराज कुंभार, मारुती डवरी, विवेक चाबूकस्वार, पिंटू आरगे, अनिल घाटगे , सागर नुल्ले, सचिन गंगाजाळे, दीपक पाटील तसेच संचालक, सभासद व कर्मचारी उपस्थित होते. अजित पिसाळ यांनी आभार मानले.


1 / 7
2 / 7
3 / 7
4 / 7
5 / 7
6 / 7
7 / 7

विभाग

आमचे वाचक